मंगळावर जायचे खाजगी प्रयत्न

Mars-One-Habitat-On-Mars

मार्स वनच्या मंगळवरील वसाहतीचे कल्पनाचित्र

मानवाने चंद्रावर पाउल ठेवून ४५ वर्षे उलटून गेली आहेत. आता मानवाला मंगळाची आस लागली आहे. जगातील अनेक वेगवेगळे देश मंगळावर आपली याने पाठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि भारतही यात मागे नाही. परंतु भारताची इस्रो, अमेरिकेची नासा किंवा युरोपमधील इसा या सरकारी संस्था आहेत. पण आता मात्र काही खाजगी कंपन्यांनीही मंगळावर जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Continue reading

अॅपल वॉच

Apple-Watch

हजारो लाखो लोकांच्या लांब प्रतिक्षेचा अखेर अंत झाला आहे. ज्या गोष्टीची ते आतुरतेने वाट पहात होते ती गोष्ट अखेर २४ एप्रिल रोजी बाजारात येणार आहे. लोक यावेळीही लांब रांगा लावून त्या गोष्टीचे स्वागत करतील. अनेक दुकानांच्या बाहेर पोलिस बोलावून गर्दीचे नियंत्रण करावे लागेल. काही लोक आदल्या दिवशी रात्रीपासून दुकानाबाहेर तंबूही ठोकतील. अमेरिकेतल्या असंख्य दुकानात पहिल्या दिवसाच्या शेवटी ती वस्तू मिळणार नाही. पहिले दोन तीन आठवडे असाच वेडेपणा चालेल! ज्या जमान्यात लोकांनी घड्याळे वापरणेच सोडून दिले आहे त्या जमान्यात घड्याळाची फॅशन पुन्हा आणण्यासाठी जबाबदार असलेली ही वस्तू म्हणजे अॅपल वॉच!

Continue reading

हिलरी क्लिंटन ईमेल घोटाळा

 

Hillary-Clinton-Closeup-Wikipediaहिलरी क्लिंटन माहीत नाही असे वाचक भारतातही फार कमीच असतील. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची पत्नी आणि त्याहूनही त्यांची जास्त चांगली ओळख म्हणजे अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री.  हिलरी क्लिंटन २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. परंतु रिंगणात उतरण्याआधीच न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. आणि हा गौप्यस्फोट तंत्रज्ञानविषयक आहे. तंत्रज्ञानामुळे राजकारणी कसे अडचणीत येऊ शकतात याचा एक नवीन अनुभव अमेरिका सध्या घेत आहे.

Continue reading

गुगलचा नविन अभिनव कॅम्पस

Google-Campus

गुगलच्या नवीन कॅम्पसचे कल्पनाचित्र

गुगलने अलिकडेच माउंटन व्ह्यू मध्ये एका नवीन मोठ्या कॅम्पसची निर्मिती करत असल्याचे जाहीर केले. खरंतर गुगलने ही घोषणा करणे हीच बातमीची गोष्ट असली तरीही प्रत्यक्ष कॅम्पसचा आराखड्याने लोकांचे अधिक लक्ष वेधून घेतले आहे. अशा प्रकारच्या इमारती प्रत्यक्षात उभारणे शक्य आहे की नाही यावरही लोक शंका घेत आहेत.

Continue reading