अॅपल कार

Apple-Logo-transparent

अॅपल खरोखरच कार बनवत आहे का? अमेरिकन वृत्तपत्रांचे रकाने सध्या या विषयाच्या चर्चेने भरून वाहत आहेत. एका खटल्याच्या निमित्ताने बाहेर आलेल्या माहितीने कार कंपन्यांची झोप उडाली आहे. फोर्ड आणि जनरल मोटर्स स्मार्टफोन बनवणार आहेत असं जर कोणी म्हटलं तर लोक हसले असते. पण अॅपल कार बनवणार आहे असं जेव्हा काही लोक म्हणत आहेत तेव्हा मात्र सर्वांचे कान टवकारले आहेत. अॅपलने यापूर्वी कुठलाही संबंध नसलेल्या उद्योगात शिरुन ती बाजारपेठ काबीज केल्याची अनेक उदाहरणे आहेत. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, डीजीटल म्युझिक, स्मार्टफोन, फोटोग्राफी अशा अनेक क्षेत्रात अॅपलने आपल्या क्रांतिकारी उत्पादनांनी पूर्ण बाजारपेठच बदलून टाकली आहे. आणि म्हणूनच वर्तमानपत्रे एवढी चर्चा करीत आहेत.

Continue reading

वॉशिंग्टन डीसी – अमरेिकेची दिल्ली?

1024px-Us_reg_dc_2872

ज्याप्रमाणे दिल्लीला पूर्ण राज्य करण्याची मागणी ‘आप’ तर्फे मांडली जात आहे त्याच प्रमाणे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी. सी. लाही अशा प्रकारचा पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी पुढे येत आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये अशा प्रकारची मागणी अमेरिकन सिनेटच्या एका समितीने ऐकून घेतली. या समितीसमोर या मागणीचा पुरस्कार करणारे व या मागणीला विरोध करणाऱ्यांनी आपआपली बाजू मांडली.

Continue reading

मध्यमवर्गीयांसाठी क्लाउड

cloud-providers

क्लाउड कंप्युटींग या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या संदर्भात वेगळा आहे. परंतु सामान्य मध्यमवर्गीय लोकांना कदाचित माहित नसते कि दररोज ते अनेक वेळा त्यांच्या नकळत ‘क्लाउड’ वापरत असतात. तुमची माहिती इंटरनेटवरील सर्व्हरवर साठवून ठेवणाऱ्या सेवांना सर्वासाधारणपणे क्लाउड म्हटलं जातं. जीमेल, फेसबुक, गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स, फ्लिकर  अशी अनेक सेवांना  ‘क्लाउड’ सेवा असे म्हणता येईल. Continue reading

नॅनोबॉट

नॅनोटेक्नॉलॉजी हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला असेलच. अतिशय सूक्म वस्तूंचा अभ्यास करून त्यांचा वापर करून घेण्याच्या शास्त्राला नॅनोटेक्नॉलॉजी असे म्हणतात. ह्या शास्त्रावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात संशोधन होत असून लवकरच या शास्त्राचे उपयोग सामान्य माणसापर्यंत पोचतील.  हे शास्त्र अर्थातच वरील एका वाक्याएवढं सोपं नाही. त्यात अनेक वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. त्यातल्याच एका तंत्रज्ञानाचा – नॅनोरोबोटीक्सचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न.

Continue reading